Post Office FD Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात तुमच्याकडील पैसा एखाद्या सुरक्षित योजनेत गुंतवणुकीच्या तयारीत आहात का ? मग आजचा हा लेख तुमच्यासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखली जाते.
या बचत योजनेचे स्वरूप बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे. यामुळे याला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात. दरम्यान आज आपण पोस्टाच्या या एफ डी योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्ष कालावधीसाठी केली तर गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळणार याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर पोटाच्या माध्यमातून सध्या स्थितीला 7.5% या दराने व्याज दिले जात आहे. या योजनेचे अकाउंट जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ओपन केले जाऊ शकते. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे बँकेच्या पाच वर्षांचा एफडी योजनेच्या तुलनेत यामधून अधिकचे रिटर्न मिळत आहे.
तसेच या योजनेत गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर सरकारची हमी राहणार आहे. यामुळे जर तुम्हाला रिस्क फ्री गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
15 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
जर या योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी नंतर म्हणजेच पाच वर्षांनी 21 लाख 74 हजार 922 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदाराला सहा लाख 74 हजार 922 रुपये व्याजाच्या स्वरूपात रिटर्न म्हणून मिळणार आहेत.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही एक, दोन, तीन आणि पाच वर्षांसाठी असते. जर एक वर्षांच्या टाइम डिपॉजिट मध्ये गुंतवणूक केली तर 6.9%, दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली तर सात टक्के, तीन वर्षाच्या टाईम डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली तर 7.10% आणि पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली तर 7.50% या इंटरेस्ट रेटने व्याज मिळणार आहे.