Post Office RD Scheme
Post Office RD Scheme

Post Office RD Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग गुंतवणूक करण्याआधी आजची ही बातमी सविस्तर वाचा. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसची आरडी योजना खूपच लोकप्रिय आहे. अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीसाठी यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून RD करणाऱ्यांना चांगला परतावा देखील मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळतं आहे. परिणामी डे बाय डे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, आता आपण पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या कालावधीच्या आरडी योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

किती व्याजदर मिळतो ?

मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पाच वर्षांच्या आरडी योजनेत वार्षिक 6.7 टक्के या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे त्रिमासिक चक्रवाढ व्याजेचा देखील फायदा मिळतो. या योजनेत मासिक किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.

विशेष म्हणजे यामध्ये कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला हवा तेवढा पैसा तो यात गुंतवणूक करू शकतो. यामध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते.

मुदतपूर्व पैसे काढता येतात का

पाच वर्षांच्या आरडी योजनेत गुंतवणूक केली अन तुम्हाला मध्येच पैशांची अडचण भासली तर तुम्ही तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून पैसे काढू शकता. म्हणजे तीन वर्षांच्या पूर्वी तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत.

पाच वर्षांचा मॅच्युरिटी काळ पूर्ण होण्याआधी आणि तीन वर्षानंतर या योजनेत गुंतवलेला पैसा काढता येतो. तसेच जर तुम्हाला पाच वर्षानंतरही या योजनेत गुंतवणूक सुरू ठेवायची असेल तर ही देखील सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये इन्व्हेस्ट केलेत तर किती व्याज मिळणार

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या आरडी योजनेत दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तीन लाख रुपये तुमची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि 56,830 रुपये हे व्याज स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत.

जर तुम्ही पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणखी पाच वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्हाला दहा वर्षांनी आठ लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत. यामध्ये सहा लाख रुपये तुमची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित रक्कम म्हणजेच दोन लाख 54 हजार 272 रुपये हे व्याज स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत.