Home आर्थिक Post Office ची धमाल योजना ! ‘या’ योजनेतुन महिन्याला 20 हजार रुपये...

Post Office ची धमाल योजना ! ‘या’ योजनेतुन महिन्याला 20 हजार रुपये व्याज मिळणार, किती रक्कम गुंतवावी लागणार ? वाचा….

Post Office Scheme
Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदार विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची देखील संख्या वाढली आहे. मात्र भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. आपल्याकडील साधे 10-20 रुपये हरवलेत तरी देखील जीवाला वाईट वाटतं.

अशा परिस्थितीत लाखो रुपयांची गुंतवणूक करायचे म्हटल्यावर प्रत्येक जण सुरक्षेची हमी मागतो. त्यामुळे आजही भारतात रिस्की ठिकाणी गुंतवणूक करण्यास टाळाटाळ केली जाते. पण, सुरक्षित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते.

पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, बँकेच्या बचत योजना, बँकेची एफडी आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिसची आरडी आणि एफडी योजना अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केली की गुंतवणूकदारांना वीस हजार रुपये महिना मिळवता येणार आहे.

कोणती आहे ती योजना ?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम. या स्कीम मध्ये 60 वर्षांपेक्षा अधिकच्या व्यक्तींना गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये जॉईंट अकाउंट देखील ओपन करता येते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 8.2% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. या योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते तर कमाल 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याची मुभा गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे.

जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या घरातील वरिष्ठ व्यक्तीसमवेत जॉईंट अकाउंट ओपन करून या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही योजना पाच वर्षांसाठी असते.

म्हणजे ही योजना पाच वर्षात परिपक्व होते. जर समजा योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच एखाद्याने या योजनेतुन पैसा काढला तर त्याला पेनल्टी द्यावी लागणार आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 8.2 टक्के या व्याज दराने सदर गुंतवणूकदाराला वार्षिक 2 लाख 46 हजार रुपये म्हणजेच महिन्याला वीस हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळणार आहे.