Post Office Scheme
Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात तुमच्याकडील पैसा एखाद्या सुरक्षित बचत योजनेत गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? मग आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. खरेतर, भारतात गुंतवणुकीसाठी अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडला पसंती दाखवली जात आहे.

मात्र, आजही बहुतांशी नागरिक सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसतर्फे सुरू असलेल्या बचत योजनांना अधिक महत्त्व दाखवले जात आहे. पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत देखील अनेकजण गुंतवणूक करत आहेत. दरम्यान, आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या आरडीवर किती व्याज मिळते ?

पोस्टाच्या आरडी स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवली जाऊ शकते. पोस्टाच्या माध्यमातून पाच वर्षांचा आरडी योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 6.7% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

जर समजा तुम्ही पोस्टाच्या या आरडी स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटीवर 5 लाख 70 हजार 929 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये तुमची गुंतवणूक 4 लाख 80 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित रक्कम म्हणजेच 90 हजार 929 रुपये तुम्हाला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच आरडी अकाउंट तुम्ही 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणखी पाच वर्षांसाठी एक्सटेंड करू शकता.

पोस्टाच्या आरडी योजना अशा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते ज्यांना प्रत्येक महिन्याला थोडी-थोडी अमाऊंट जमा करून मोठा फंड तयार करायचा असतो. त्यामुळे जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुम्ही आर डी योजनेत महिन्याला एक ठराविक अमाऊंट गुंतवून चांगला मोठा फंड तयार करू शकणार आहेत.