Post Office Scheme : गेल्या काही वर्षांपासून भारतात गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडला विशेष पसंती दाखवली जात आहे. अनेक जण येथे गुंतवणूक करत आहेत. मात्र आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे विशेष आवडते.
थोडासा परतावा कमी मिळाला तरी चालेल मात्र सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करावे असे अनेकांचे म्हणणे आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात.
मात्र आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जी की बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे मात्र यातून मिळणारा परतावा हा एफडी पेक्षा अधिक राहणार आहे.
या योजनेत एक ठराविक रक्कम गुंतवल्यानंतर सहा लाख 74 हजार रुपयांचे व्याज मिळू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर माहिती.
कोणती आहे ती योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना. या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. ही टीडी योजना गुंतवणूकदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
पोस्टाची ही एफडी योजना एक, दोन, तीन आणि पाच वर्ष कालावधीसाठी असते. पोस्टाच्या एक वर्षाच्या TD योजनेत गुंतवणूकदाराला 6.9%, दोन वर्षाच्या टीडी योजनेत सात टक्के, तीन वर्षाच्या टीडी योजनेत 7.10% आणि पाच वर्षांच्या टीडी योजनेत 7.50% एवढे व्याज मिळते.
कसे मिळणार 6 लाख 74 हजार
जर पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 21 लाख 74 हजार 922 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 15 लाख रुपयांची गुंतवणूक वजा केली असता सदर गुंतवणूकदाराला सहा लाख 74 हजार 922 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
निश्चितच, पोस्टाच्या या योजनेतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे. विशेष म्हणजे ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. येथे गुंतवलेला एकही रुपया वाया जाणार नाही. यामुळे सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठी पोस्टाची ही एफडी योजना म्हणजेचं पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना फायदेशीर ठरणार आहे.