Post Office Scheme News : भारतात फार पूर्वीपासून सुरक्षित गुंतवणुकीला अधिक महत्त्व आहे. तथापि, अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक वाढली आहे. शेअर बाजारावर आधारित म्युच्युअल फंड मध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जात आहे. परंतु असे असले तरी आजही अनेकजण बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, आरडी योजना अशा सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य देतात ही वास्तविकता नाकारून चालणार नाही.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
कारण की, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी एक निश्चित अमाऊंट गुंतवली तर त्यांना वार्षिक एक लाख 11 हजार रुपयांची कमाई होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पोस्ट ऑफिसच्या भन्नाट योजनेची सविस्तर माहिती.
कोणती आहे ती योजना ?
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या स्मॉल सेविंग स्कीम चालवल्या जात आहेत. अशीच एक अल्पबचतीची योजना आहे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. या बचतीच्या योजनेत सिंगल अकाउंट किंवा मग जॉईंट अकाऊंट ओपन केले जाऊ शकते.
एखाद्या गुंतवणूकदाराने सिंगल एमआयएस अकाउंट ओपन केले तर त्याला कमाल नऊ लाख रुपये गुंतवता येतील. म्हणजेच सिंगल अकाउंट ओपन केल्यास नऊ लाख रुपयांपेक्षा जास्तीचा पैसा या योजनेत गुंतवता येऊ शकत नाही. तसेच जर एखाद्याने जॉईंट अकाउंट ओपन केले तर त्याला कमाल 15 लाख रुपये गुंतवता येणार आहेत.
या योजनेचा कालावधी हा पाच वर्ष एवढा आहे. म्हणजे पाच वर्षांपर्यंत या योजनेत पैसा गुंतवता येतो. जर समजा एखाद्याला मध्येच पैशांची अडचण आली आणि त्यांना पैसा काढायचा असेल तर एक वर्षानंतर या योजनेतून पैसा काढता येतो. मात्र यासाठी पेनल्टी द्यावी लागते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चांगले व्याजदर दिले जात आहे.
मिळते एफडी पेक्षा अधिकचे व्याजदर
पाच वर्षांच्या टॅक्स सेविंग एफडीवर जेवढे व्याज मिळते त्यापेक्षा या योजनेतून चांगले व्याज मिळत आहे. यामुळे पोस्टाची ही योजना गुंतवणूकदारांमध्ये विशेष लोकप्रिय बनली आहे.
या योजनेत गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित तर राहतोच शिवाय फिक्स डिपॉझिट पेक्षा चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली असून अनेकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. या योजनेच्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर एम आय एस योजनेत पोस्ट ऑफिस कडून 7.4% या व्याजदराने व्याज दिले जात आहे.
कसे मिळणार वार्षिक एक लाख 11 हजार रुपये?
जर तुम्हाला या योजनेतून दरवर्षी एक लाख 11 हजार रुपयांची कमाई करायची असेल म्हणजेच महिन्याला 9250 मिळवायचे असतील तर तुम्हाला यामध्ये पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला जॉईंट अकाउंट ओपन करावे लागेल.
तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत जॉईंट अकाउंट ओपन करू शकता. परिवारातील इतर कोणत्याही सदस्या सोबत तुम्ही या योजनेअंतर्गत जॉईंट अकाउंट ओपन करून 15 लाख रुपये गुंतवू शकता. 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाकाठी एक लाख 11 हजार रुपये व्याज मिळणार आहे.