SBI And ICICI Vehicle Loan : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या वाहन कर्जाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय आणि आयसीआयसीआय या बँकेच्या वाहन कर्जाची आज आपण तुलना करणार आहोत.
या बँकेपैकी कोणत्या बँकेचे वाहन कर्ज ग्राहकांना फायदेशीर ठरू शकते हे आज आपण पाहणार आहोत. खरंतर एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.
तसेच आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. या दोन्ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर वाहन कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
एसबीआय बँकेचे वाहन कर्जासाठीचे व्याजदर : एसबीआय बँक नवीन कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 8.85% ते 9.50% या इंटरेस्ट रेट वर कर्ज उपलब्ध करून देत आहे.
जर समजा एखाद्या ग्राहकाला नवीन कार खरेदी करण्यासाठी एसबीआयच्या 8.85% या किमान इंटरेस्ट रेट वर पाच वर्ष कालावधीसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 20686 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे या कालावधीत सदर ग्राहकाला बारा लाख 41 हजार 160 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच दोन लाख 41 हजार 160 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.
आयसीआयसीआय बँकेचे कार लोन वरील व्याजदर : आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना 36 ते 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 9.10% या इंटरेस्ट रेट वर कार लोन उपलब्ध करून देत आहे. म्हणजेच जर बँकेकडून पाच वर्ष कालावधीसाठी एखाद्या ग्राहकाला दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर त्याला वीस हजार 807 रुपयाचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला 12 लाख 48 हजार 420 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच दोन लाख 48 हजार 420 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.