SBI And PNB Banking News : आज आपण देशातील दोन प्रमुख सरकारी बँकांच्या गृहकर्जाची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय आणि पीएनबी या देशातील दोन प्रमुख सरकारी बँका. या दोन्ही बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या बाजारात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र या दोन्ही बँकांपैकी सर्वात कमी इंटरेस्ट रेट वर कोणती बँक गृह कर्ज उपलब्ध करून देते? याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
पंजाब नॅशनल बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर : पंजाब नॅशनल बँक किमान 9.45% ते कमाल 11.60% दराने गृह कर्ज उपलब्ध करून देते. जर समजा पंजाब नॅशनल बँकेकडून किमान 9.45% दराने वीस वर्षांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज दिले गेले तर 27 हजार 866 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर कर्जदाराला 66 लाख 87 हजार 840 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच या कालावधीत सदर कर्जदाराला 36 लाख 87 हजार 840 रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहेत.
एसबीआय बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर : एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% ते कमाल 9.65% या दराने गृहकर्ज ऑफर केले जात आहे.
जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआय बँकेकडून 8.50% दराने वीस वर्षे कालावधीसाठी तीस लाख रुपयांची कर्ज मंजूर झाले तर त्या व्यक्तीला 26 हजार 35 रुपयांचा मासिक हप्ता करावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर कर्जदाराला 62 लाख 48 हजार 400 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच या काळात 32 लाख 48 हजार 400 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.
एसबीआयचे गृह कर्ज परवडणार
वर सांगितलेल्या कॅल्क्युलेशननुसार एसबीआयचे गृह कर्ज ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध होणार आहे. मात्र असे असले तरी बँकेकडून ज्या लोकांचा सिबिल स्कोर आठशेच्या आसपास असेल त्याचं लोकांना किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते.