SBI Bank FD News : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. भारतात एकूण 12 सरकारी बँका असून यातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला ओळखले जाते. दरम्यान, आज एसबीआय बँकेने आपल्या काही निवडक कालावधीच्या एफडी व्याजदरात सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे एसबीआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एसबीआय बँकेत एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे.
कारण की, आज आपण एसबीआय बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर.
किती व्याज मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सध्या स्थितीला तीन वर्षांच्या एकटीसाठी सामान्य ग्राहकांना 6.75% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. मात्र याच कालावधीच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 7.25% एवढे इंटरेस्ट दिले जात आहे.
10 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार
या एफडी योजनेत गुंतवणूकदारांनी दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांना मॅच्युरिटी वर किती रक्कम मिळणार ? सामान्य ग्राहकांना या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 6.75 टक्के या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. यानुसार जर सामान्य ग्राहकांनी यामध्ये दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर बारा लाख 22 हजार 392 रुपये मिळणार आहेत.
तसेच ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना एफडी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच तीन वर्षांनी 7.25% या इंटरेस्ट रेटने बारा लाख 40 हजार 546 रुपये मिळणार आहेत. या ठिकाणी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की व्याजदरात बदल झाल्यानंतर या रकमेत सुद्धा बदल होणार आहे.