SBI Bank Home Loan : आपल्यापैकी अनेकांचे नवीन घराचे स्वप्न असेल. मात्र अलीकडे प्रॉपर्टीच्या किमती खूपच वाढल्या आहे. जमिनीचे दर खूपच कडाडले आहेत. भारतीय शहरीकरण औद्योगिकीकरण नागरिकीकरण वाढती लोकसंख्या या साऱ्या पार्श्वभूमीवर जमिनीच्या किमती वाढत आहेत. शिवाय बिल्डिंग मटेरियलचे दर देखील खूपच वाढले आहेत. यामुळे अलीकडे घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे अनेक जण घरासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एसबीआय बँकेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. कारण की, एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज ऑफर करत आहे.
ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना एसबीआय बँकेच्या माध्यमातून कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन पुरवले जाते. सिबिल स्कोर 800 च्या आसपास असल्यास एसबीआय बँकेच्या माध्यमातून ९.१५ टक्के इंटरेस्ट रेट वर होम लोन उपलब्ध होऊन जाते. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना 9.15 टक्के ते 9.65 टक्के दरम्यानच्या व्याजदरात होम लोन देत आहे.
ग्राहकांना कोणत्या इंटरेस्ट रेट वर कर्ज मंजूर होणार हे सर्वस्वी त्यांच्या सिबिल स्कोरवर आधारित असते. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 ते 800 या दरम्यान असतो त्यांना एसबीआय बँकेच्या किमान व्याजदरात म्हणजेच 9.15% या व्याजदरात गृह कर्ज मंजूर होऊ शकते असे म्हटले जात आहे.
सिबिल स्कोर 550 ते 649 तर 9.65% या इंटरेस्ट रेट वर होम लोन मिळते. एसबीआय बँकेचे होम लोन वरील हे व्याजदर फ्लोटिंग आहेत. हे व्याजदर रेपो रेटसोबत लिंक असतात अस आपण म्हणू शकतो. कारण की, रेपो रेट वाढले की हे व्याजदर वाढू शकतात आणि रेपो रेट कमी झाले तर व्याजदर कमी देखील होऊ शकतात.
जर समजा तुम्हाला SBI कडून 9.15% दराने 25 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर झाले तर मासिक EMI म्हणून 33,980 रुपये भरावे लागणार आहेत. या कर्जामध्ये तुम्हाला एकूण 61,94,000 रुपये व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजे मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम असे एकूण एक कोटी एक लाख 94 हजार रुपये भरावे लागणार आहेत.