SBI Bank Personal Loan Details : जेव्हा आपल्याला पैशांची अचानक गरज भासते तेव्हा आपण आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैशांची ऍडजेस्टमेंट करत असतो. परंतु जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही अशावेळी आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. बँकेकडून पर्सनल लोन घेत असतो.
दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात पर्सनल लोन घेण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची करणार आहे. विशेषता ज्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या पर्सनल लोन ची माहिती पाहणार आहोत. एसबीआय बँकेकडून जर सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर ग्राहकांना किती रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.
एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर?
मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना सध्या 11.15 टक्के या इंटरेस्ट रेटने वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. तथापि बँकेचे हे सुरुवातीचे व्याजदर आहे. याचा फायदा केवळ अशाच ग्राहकांना होणार आहे ज्यांचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा जास्त असेल.
ज्यांचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी असेल त्यांना या इंटरेस्ट रेटने वैयक्तिक कर्ज मिळणार नाही. कमी सिबिल स्कोर असलेल्या लोकांना अधिकचे व्याजदर द्यावे लागणार आहे.
सात लाखांचे पर्सनल लोन घेतल्यास कितीचा हफ्ता
जर समजा एखाद्या ग्राहकाला 11.15% या किमान व्याजदरात सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज तीन वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 22,967 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर ग्राहकाला या कालावधीत बँकेला आठ लाख 26 हजार 812 रुपये द्यावे लागणार आहेत. अर्थातच एक लाख 26 हजार 812 रुपये व्याज स्वरूपात धरावे लागणार आहे.