SBI Bank Personal Loan News : स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहकांसाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध कर्ज उपलब्ध करून देत आहे.
एसबीआय बँकेच्या माध्यमातून होम लोन, पर्सनल लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन असे नानाविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एसबीआय बँकेकडून पर्सनल लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण एसबीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची सविस्तर अशी माहिती थोडक्यात पाहणार आहोत.
एसबीआय बँक वैयक्तिक कर्जासाठी किती व्याज आकारते
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांकडून वैयक्तिक कर्जासाठी 11.15% या इंटरेस्ट रेटवर कर्ज दिले जात आहे. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर आहे. या इंटरेस्ट रेटचा फक्त अशाच ग्राहकांना फायदा होतो ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर हा चांगला असतो.
आठशेच्या आसपास सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना या किमान इंटरेस्ट रेट वर वैयक्तिक कर्ज उपलब्ध होते. मात्र जर यापेक्षा कमी सिबिल स्कोर असेल तर वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांना अधिकचे व्याज द्यावे लागणार आहे.
8 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार
जर समजा एखाद्या ग्राहकाला 11.15% या इंटरेस्ट रेट वर आठ लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 17453.83 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
अर्थातच सदर व्यक्तीला या पाच वर्षांच्या कालावधीत दहा लाख 47 हजार 231 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये मूळ रक्कम आणि व्याज याचा समावेश आहे. आठ लाख रुपये मूळ रक्कम आणि उर्वरित दोन लाख 47 हजार 231 रुपये भरावे लागणार आहेत.