SBI FD Scheme
SBI FD Scheme

SBI FD Scheme : तुम्हीही नजीकच्या बँकेत एफडी करणार आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. सुरक्षित गुंतवणुकीला अलीकडे विशेष महत्त्व दाखवले जात आहे. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये अशीच सर्वांची इच्छा असते. शिवाय बँकांनी देखील एफडी व्याजदरात चांगली वाढ केली आहे.

यामुळे एफडी मध्ये पैसा गुंतवणे आता गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरत आहे. हेच कारण आहे की महिला वर्ग देखील आता एफडी मध्ये पैसा गुंतवत आहेत. आधी महिलावर्ग सोन्यात गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवत. पण, अलीकडे एफडी मधून चांगला परतावा मिळू लागल्याने महिला देखील मोठ्या प्रमाणात एफडी करू लागल्या आहेत.

दरम्यान, आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका विशेष एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुम्हालाही एसबीआयमध्ये FD करायची असेल तर ही एसबीआयची विशेष FD योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कोणती आहे ती एसबीआयची विशेष FD योजना

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे एसबीआयची अमृत कलश एफडी योजना. देशातील सर्वात मोठ्या बँकेची अर्थातच एसबीआयची ही विशेष योजना 400 दिवसांची आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.6% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

या चारशे दिवसांच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% आणि जेष्ठ नागरिकांना 7.60% या इंटरेस्ट रेटने परतावा दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या योजनेत ज्या लोकांना गुंतवणूक करायची असेल त्यांना लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण की या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच मुदत देण्यात आली आहे.

SBI बँकेने सांगितल्याप्रमाणे, अमृत कलश एफडीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक आणि सहामाही कालावधीत व्याज दिले जाणार आहे. SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा केले जातात.

SBI वेबसाइटनुसार, अमृत कलश FD मध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांपूर्वी काढले गेल्यास, बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50% ते 1% कमी व्याजदर वजा करू शकते. निश्चितच एसबीआयच्या या एफडी योजनेतून चारशे दिवसाच्या कालावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.