SBI Home Loan
SBI Home Loan

SBI Home Loan : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत असते. बँकेकडून होम लोन, बिझनेस लोन, वैयक्तिक कर्ज, एज्युकेशनल लोन, बिझनेस लोन असे विविध प्रकारचे कर्ज दिले जात आहेत.

बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना अवघ्या 9.55% इंटरेस्ट रेट वर होम लोन अर्थातच गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते. खरंतर आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. काही लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक आजही या स्वप्नासाठी झगडत असतील.

दरम्यान जर तुम्हीही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 9.55% ते 10.05% इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज ऑफर करत आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेच्या माध्यमातून कमीत कमी इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना किमान 9.55% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज ऑफर करत आहे.

मात्र ज्या लोकांचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी असतो त्यांना अधिकच्या व्याजदरात गृह कर्ज मंजूर होते. 550 ते 649 या दरम्यान सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना एसबीआय कडून 10.05 टक्के या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज ऑफर केले जात आहे.

50 लाखांचे गृह कर्ज मंजूर झाल्यास कितीचा हप्ता?

जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआय कडून 50 लाख रुपयांचे गृह कर्ज 9.55% या किमान इंटरेस्ट रेट वर तीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 42 हजार 225 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच या कालावधीत सदर कर्जदाराला एक कोटी 52 लाख एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये एक कोटी दोन लाख एक हजार रुपये व्याज राहणार आहे.