SBI Home Loan : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात गृह खरेदीसाठी गृहकर्जाचा पर्याय स्वीकारणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फायद्याचा ठरणार आहे. खरेतर अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. मोठी तारेवरची कसरत करूनही अनेकदा घर खरेदी शक्य होत नाही.
अशावेळी अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. मात्र, ज्या बँका कमी इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज देतात त्यांच्याकडूनच गृह कर्ज घेण्याला ग्राहकांची पसंती असते. अशा परिस्थितीत, एसबीआय या सरकारी बँकेकडून गृह कर्ज घेण्याला देखील ग्राहकांच्या माध्यमातून पसंती दाखवली जात आहे.
दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्ज विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हीही भविष्यात स्टेट बँक ऑफ इंडिया कडून गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख मोठ्या कामाचा ठरणार आहे.
एसबीआय बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देते. या बँकेकडून 9.15% ते 9.65% या इंटरेस्ट रेटवर आपल्या ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
तथापि, ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाचं कमी व्याज दरात कर्ज मंजूर होते. यामुळे ग्राहकांनी एसबीआयकडून गृह कर्ज घेतल्यास त्यांना घर खरेदीचा सौदा परवडणार आहे.
एसबीआयकडून 40 लाखांचे गृह कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ?
जर एखाद्या ग्राहकाला एसबीआय बँकेकडून 40 लाख रुपयांचे कर्ज 9.15 टक्के या किमान इंटरेस्ट रेटवर वीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 36 हजार 376 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत सदर व्यक्तीला 87 लाख तीस हजार 240 रुपये भरावे लागणार आहेत.
म्हणजे त्या व्यक्तीला 47 लाख तीस हजार 240 रुपये व्याज भरावे लागणार आहे. एवढेच नाही तर गृह कर्जासाठी प्रोसेसिंग फी देखील आकारली जाते. यामुळे गृहकर्जावर सदर व्यक्तीला प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागणार आहे.
जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआय बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज 9.15 टक्के या किमान इंटरेस्ट रेट वर वीस वर्षे कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 45 हजार 470 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला एक कोटी नऊ लाख 12 हजार आठशे रुपये भरावे लागणार आहे. अर्थातच या कालावधीत सदर ग्राहकाला 59 लाख बारा हजार आठशे रुपये व्याज भरावे लागणार आहे.