SBI Home Loan : आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. या स्वप्नासाठी अनेकजण अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अनेकांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होत नाही. आयुष्यभर साठवलेली जमापुंजी लावुनही अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशावेळी समोर गृह कर्जाचा पर्याय दिसतो.
अनेकजण गृह कर्ज घेऊन आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करतात. अलीकडे देशातील काही प्रमुख बँकांनी आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये होम लोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बँका आता ताबडतोब गृह कर्ज मंजूर करून देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण देखील होत आहे.
एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
दरम्यान जर तुम्हीही एसबीआयकडून होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या होम लोन बाबत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआयच्या होमलोनचे व्याजदर
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 9.15% या व्याजदरात गृह कर्ज देत आहे. मात्र बँकेचे हे सुरुवातीचे व्याजदर आहे. या व्याजदरात फक्त अशाच लोकांना गृह कर्ज मिळणार आहे ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो. 800 च्या आसपास सिविल कोर असलेल्या ग्राहकांना या व्याजदरात गृह कर्ज मंजूर होऊ शकते.
40 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल
जर समजा एखाद्या ग्राहकाला बँकेच्या किमान व्याजदरात म्हणजेच 9.15% व्याजदर 40 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 36,376 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
एसबीआय होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, सदर ग्राहकाला या वीस वर्ष कालावधीसाठी 47 लाख 30 हजार 197 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 87 लाख 30 हजार 197 रुपये सदर व्यक्तीला भरावे लागणार आहेत. तथापि या रकमेत प्रोसेसिंग फी आणि बँकेचे इतर चार्जेस समाविष्ट नाहीयेत.