Union Bank Of India New Credit Card : जर तुम्हीही युनियन बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. ही बातमी युनियन बँकेच्या महिला ग्राहकांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे. कारण की, युनियन बँकेने नुकतेच एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.
हे नवीन क्रेडिट कार्ड महिला ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले असून याचे महिला ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. या क्रेडिट कार्डला युनियन बँकेने ‘दिवा’ असे नाव दिले आहे. युनियन बँक ही देशातील बारा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक प्रमुख बँक आहे.
ही पीएसबी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना लॉन्च करत असते. स्वस्तात आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवत असते. बँकेकडून ग्राहकांना क्रेडिट कार्ड देखील ऑफर केले जात आहे. नुकतेच बँकेने आपल्या महिला ग्राहकांसाठी विशेष क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. दरम्यान आज आपण या महिलांसाठी लॉन्च झालेल्या युनियन बँकेच्या Divaa क्रेडिट कार्डची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळणार Divaa क्रेडिट कार्ड
युनियन बँकेचे हे क्रेडिट कार्ड फक्त महिलांसाठी राहणार आहे. म्हणजेच या क्रेडिट कार्डसाठी फक्त महिला ग्राहक अर्ज करू शकणार आहेत. 18 ते 65 वर्ष वयोगटातील पगारदार महिला आणि 18 ते 70 वर्ष वयोगटातील सेल्फ एम्प्लॉइड महिला या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकणार आहेत. हे क्रेडिट कार्ड अशाच महिलांना दिले जाणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न किमान अडीच लाख रुपये एवढे आहे. आता आपण या क्रेडिट कार्ड चे फायदे तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत याचे फायदे
हे क्रेडिट कार्ड बुक माय शो, अर्बन क्लॅप, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, मंत्रा, न्याका आणि इतर ब्रँड्सच्या डिस्काउंट व्हाउचरसह येते. याशिवाय, या क्रेडिट कार्डवर महिलांना एका वर्षात 8 कंप्लिमेंटरी डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज आणि 2 कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल एअरपोर्ट लाउंजची सुविधा मिळणार आहे.
त्याच वेळी, वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधा देखील या क्रेडिट कार्डसह ऑफर केली जाणार आहे. या क्रेडिट कार्डचा वापर करून जर महिला ग्राहकांनी इंधन खरेदी केले तर एक टक्के इंधन अधिभाराची सूट देखील मिळणार आहे. पण ही सूट दरमहा 100 रुपयांपर्यंतच राहणार आहे. दिवा क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी सदर क्रेडिट कार्डधारक महिलेला 2 रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत.
किती चार्जेस द्यावे लागतील
या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी ही शून्य आहे. परंतु यासाठी वार्षिक 499 रुपयांची फी द्यावी लागणार आहे. जर या क्रेडिट कार्डचा वापर करून 30 हजार रुपयांपेक्षा अधिकचा वार्षिक खर्च केला तर तुम्हाला फि मध्ये शंभर टक्के सवलत मिळू शकणार आहे. निश्चितच हे क्रेडिट कार्ड महिला ग्राहकांसाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे.