Union Bank Special FD Scheme
Union Bank Special FD Scheme

Union Bank Special FD Scheme : एफ डी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांनी आणि स्मॉल फायनान्स बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि रेपो रेट मध्ये गेल्या काही महिन्यात कोणताच बदल केलेला नसल्याने बँकांनी आता एफडी च्या व्याजदरात चांगली भरीव वाढ केली आहे.

यामुळे अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला प्राधान्य दाखवले जात आहे. इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आता एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवले जात आहे.

अलीकडे महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. मात्र अनेकांच्या माध्यमातून FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांविषयी विचारणा केली जात आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या 333 दिवसांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कशी आहे युनियन बँक ऑफ इंडिया ची 333 दिवसांची एफडी योजना?

खरे तर युनियन बँक ऑफ इंडिया ने अलीकडेच आपल्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. या नवीन संशोधित दरानुसार 333 दिवसांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना युनियन बँक ऑफ इंडिया कडून 7.4 टक्के या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% म्हणजेच 7.90% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जात आहे.

एक लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार

जर समजा युनियन बँक ऑफ इंडियाच्या 333 दिवसांच्या विशेष एफडी योजनेत एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर एक लाख सहा हजार 979 रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच एक लाखाच्या गुंतवणुकीवर 6,979 रुपये रिटर्न मिळणार आहेत. जर एखाद्याला कमी कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर युनियन बँकेची ही योजना त्यांच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.