Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. शेतकऱ्यांचे हित जोसण्याचा केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थातच 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरवात केली.

या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. मात्र हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. मागील 16 वा हफ्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला होता.

या सोळाव्या हप्त्यासोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ दिला गेला होता. राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते या सोळाव्या हफ्त्यासोबत दिले गेले. विशेष म्हणजे आता आगामी सतरावा हप्ता केव्हा येणार याबाबत देखील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

खरंतर सध्या स्थितीला संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. १९ एप्रिल 2024 पासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि चार जून 2024 ला मतदानाचा निकाल लागणार आहे.

दरम्यान, मतदानाचा निकाल लागला की लगेच पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळू शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. 4 जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे यामुळे जून अखेरपर्यंत किंवा मग जुलैच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

निश्चितच असे झाल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हफ्त्यासोबत नमो शेतकरीचा देखील हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील हप्त्यासोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये मिळू शकतात.