Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा पुढील सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

खरे तर पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जात आहे.

आतापर्यंत या योजनेचे एकूण 16 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. म्हणजेच ज्याने या योजनेचा पहिला हप्त्यापासून लाभ घेतलेला असेल त्याला आतापर्यंत 32 हजार रुपये मिळालेले असतील. मागील सोळावा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.

दरम्यान या योजनेचा पुढील सतरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाईल असे वृत्त समोर आले आहे. सरकारने या संदर्भात अजून अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र या योजनेचा आत्तापर्यंतचा पॅटर्न पाहिला असता मे महिन्यात या योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो असे बोलले जात आहे.

निश्चितच जर मे महिन्यात या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही अक्षय तृतीयाची मोठी भेट राहणार आहे. यावर्षी अक्षय तृतीया 10 मे 2024 ला आहे.

अशा परिस्थितीत जर या योजनेचा पुढील सतरावा हप्ता हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला तर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी या पैशांची मोठी मदत होऊ शकते. विशेष बाब अशी की मागील 16 वा हप्ता देतांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

यामुळे पीएम किसानचा सतरावा हप्ता जेव्हा दिला जाईल त्यावेळी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

असे झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 असे एकूण 4 हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा अक्षय तृतीयाचा यंदाचा सण हा गोड होणार अशी आशा व्यक्त होत आहे.