राज्यासह पूर्ण जिल्ह्यात थंडीचा चांगलाच जोर वाढत चाललाय.या थंडीपासून रक्षण करण्यासाठी गरम कपडे वापरले जातात,शेकोटीची उब घेतात.या गुलाबी थंडीत अंघोळ करायची म्हणलं तर जीवावरच येत असतं.
थंडीच्या भीतीने काहीजण तर अंघोळच करायचं टाळतात.तर काही लोक इतक्या थंडीतही गार गार पाण्याने अंघोळ करतात.पण जास्त गार पाण्याने किंवा जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात आणि हृदयाच्या विकाराला आमंत्रित करू शकतात.
अशा वातावरणात थंडी घालविण्यासाठी बहुतांश जण सकाळी अतिगरम पाण्याने अंघोळ करतात, तर काहींना गार पाण्याने अंघोळ करण्याची सवय आहे. मात्र, या दोन्ही सवयी शरीरासाठी घातक आहेत.
अतिगरम किंवा अतिगार पाण्याने अंघोळ करणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण देणे आहे. त्यामुळे कोमट पाण्यानेच अंघोळ करावी,असा सल्ला हृदरोग तज्ज्ञ देतात.हृदयाच्या स्नायुंच्या भागांना पुरेसे रक्त मिळत नाही.
हृदयाच्या धमन्या अचानक अरुंद झाल्यामुळे आणि त्यांच्यात रक्तप्रवाह अतिशय मंद झाल्याने हृदयविकार येत असतो. थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे रक्तदाब वाढतो त्यामुळे हृदयावर अतिरक्तदाब निर्माण होतो.अशावेळी अतिगरम अथवा थंडगार पाण्याने अंघोळ करणे धोकादायक ठरू शकते.
कडक पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढतोः कडक पाण्याने अंघोळ केल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो.हृदयावर ताण वाढतोः थंडीत अतिगरम पाण्याने अंघोळ केल्यास हृदयावर अतिरिक्त ताण पडण्याचा धोका असतो.
गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू सैल होतात. तसेच स्नायुंच्या वेदना कमी होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.गरम पाण्याने अंघोळ केल्यास आळस जातो,तसेच यामुळे मानसिक ताण कमी होऊन मन प्रसन्न होते. मात्र,अतिगरम पाणी वापरले तर त्याचे धोकेही वाढतात.