हिवाळा हा खरोखरच एक वेगळा आनंद देणारा ऋतू आहे.थंड हवामान, उनवार कपडे, आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल.याच काळात लोकांना व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. थंड हवामानामुळे उत्साह वाढतो. शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि पचनक्षमता वाढल्यामुळे जड पदार्थही सहज पचतात.
त्यामुळे अनेकजण शरीर फिट ठेवण्यासाठी व्यायामाला सुरुवात करतात; मात्र व्यायामाला सुरुवात करताना आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल न केल्यास याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
व्यायाम सुरू केल्यावर शरीराला प्रथिनं, फायबर्स आणि योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्सची गरज असते. फक्त वर्क आउट केल्याने शरीर चांगलं होत नाही; त्यासाठी योग्य पोषण गरजेचं आहे.अनेकदा आपण व्यायामाला सुरुवात करतो, पण आहारात पूर्वीप्रमाणे गोडधोड, तळलेले पदार्थ, आणि जंक फूडचा समावेश राहतो.
प्रथिनं खायू बांधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे रोजच्या आहारात डाळी, कडधान्यं, अंडी, दूध, पनीर, कोंबडीचं मांस आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश करा. प्रथिनं नैसर्गिक स्रोतांमधून मिळाल्यास शरीराला जास्त फायदेशीर ठरतात.
हिवाळ्यात थंड हवेमुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि त्यामुळे व्यायाम करणं अधिक सुलभ होतं; पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की व्यायाम अचानक वाढवू नये. सुरुवातीला कमी वेळ आणि हलक्याफुलक्या व्यायाम प्रकारांनी सुरुवात करा.
शरीराला नवीन दिनचर्येची सवय लागू द्या. शरीर तयार झाल्यावरच व्यावामाचा कालावधी किंवा तीव्रता वाढवा, अन्यथा, दुखापतींचा धोका असतो. हिवाळा हा आरोग्य सुधारण्यासाठी सर्वांत चांगला काळ आहे. पचनक्षमता चांगली असते आणि व्यायामाचा परिणाम चटकन दिसती.
त्यामुळे या हंगामाचा पुरेपूर उपयोग करा; पण है करताना आहार, झोप, आणि व्यायाम या तीन गोष्टींत समतोल राखा. योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करा, शरीरावर ताण देऊ नका आणि हळूहळू सुधारणा साधा. हिवाळ्यात तुमचं शरीर चांगलं बनवण्यासाठी तयार असतं, तुम्हीही त्यासाठी तयार राहा.
व्यायाम सुरू करा रोज थोडावेळ चालणे, सूर्यनमस्कार घाला किंवा साधा हलका व्यायाम करण सुरू करा. शरीराला हळूहळू तयार होऊ द्या.जंक फूड टाळा, प्रथिनं आणि फायबर्सयुक्त आहार घ्या. फळं, भाज्या, आणि डाळीचा अधिक समावेश करा.घ्यान, प्राणायाम किंवा फक्त शांततेत बसून स्वतः साठी काही क्षण घ्या.
उत्साह निर्माण करा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टीवर काम करा, जसे की एखादं पुस्तक वाचण, काही नवीन शिकण, किंवा एखादा कला प्रकार सुरू करणं, मोठे बदल करण्याऐव्जी लहान बदलांना प्राधान्य द्या.स्वतःला वेळ द्या.अतिरेकी अपेक्षा ठेवून स्वतःला त्रास देऊ नका.एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
बहुतांशी लोक थंडी सुरू झाली, की मोठ्या उत्साहाने व्यायामाल सुरुवात करतात; परंतु नव्याचे नऊ दिवस, या म्हणीप्रमाणे काही दिवसांतच त्यांचा उत्साह मावळतो आणि पुन्हा ते झोपेच्या अधीन जातात.
व्यायाम आणि आहाराच्या जोडीला पुरेशी झोपही अत्यावश्यक असते. झोपेमुळे शरीराच्या तुटलेल्या खायूची दुरुस्ती होते आणि नवीन ऊर्जेचा साठा तयार होतो. अपुरी झोप घेतल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे व्यायामाचा प्रभाव कमी होतो. रोज किमान ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.
सध्याच्या काळात अनेक जण जिममध्ये उपलब्ध असलेल्या प्रोटीन पावडर्सकडे वळतात; पण हे करताना जागरूक राहणं गरजेचं आहे.काही पावडर्समध्ये स्ट्रेरॉइड्स मिसळलेले असतात,जे शरीराला तात्पुरतं ताकदवान दाखवत असले, तरी दीर्घकाळासाठी शरीराचं नुकसान करतात.नेहमी प्रमाणित कंपन्याचीच उत्पादने निवडा. शक्य असल्यास नैसर्गिक प्रथिनं आहारातूनच मिळवण्याचा प्रयत्न करा
हिवाळ्यात उत्साहामुळे अनेक जण व्यायामाचा अतिरेक करतात, मात्र हे शरीरासाठी घातक ठरू शकतं. शरीराला विश्रांती देणं, हलका व्यायाम करणे आणि शरीराची क्षमता ओळखूनच पुढे जाणे महत्त्वाचे आहे.अतिव्यायामामुळे त्रायूंवर अतिरिक्त ताण येतो, दुखापती होतात आणि थकवा जाणवतो. कधी कधी आयुष्यभराचं दुखणं मागे लागतं.
खेळ विज्ञान सांगतं की, शरीर फिट ठेवण्यासाठी ‘व्यायाम, पोषण, आणि विश्रांती’ हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. हिवाळ्यात व्यायामाला सुरुवात करताना या तिन्ही बाबींमध्ये योग्य समतोल ठेवणं गरजेचं आहे. व्यायामानं शरीराच्या उर्जेचा वापर होतो. आहार शरीराला आवश्यक पोषण पुरवतो, आणि झोप शरीराला पुन्हा तयार करते.