मेष : सायंकाळनंतर आपणाला विशेष अनुकूलता लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुमचा उत्साह द्विगुणित होणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ – स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. संध्याकाळी काही अनावश्यक खर्च संभवतात. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. दुपारनंतर काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे.
मिथुन : उत्साही व आनंदी राहणार आहात. सायंकाळी काहींना अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक प्रभाव राहील. दुपारनंतर प्रियजनांकडून विविध लाभ होणार आहेत. प्रवासात फायदा होणार आहे.
कर्क : चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत
सिंह : मनोबल कमी असणार आहे. सायंकाळी तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग कमी होईल. दुपारनंतर प्रियजन भेटणार आहेत
कन्या : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडेल.
वृश्चिक : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. काहीजण मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च करणार आहेत.
धनु : दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील.
मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होणार आहेत.
मीन : सायंकाळी काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. दुपारनंतर कुटुंबाकरिता वेळ देऊ शकणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.