Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. सूर्य ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते हे विशेष. सूर्यग्रहाला ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाते.
यामुळे जेव्हा केव्हा सूर्यग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. सूर्यग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा देखील राशीचक्रातील सर्वच राशींवर परिणाम होतो.
दरम्यान पुढील महिन्यात सूर्यदेव नक्षत्र परिवर्तन करणार असल्याची माहिती ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी दिली आहे. सहा नोव्हेंबरला सूर्य ग्रह स्वामी नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव म्हणून तीन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे.
कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार फायदा
वृश्चिक : नोव्हेंबर महिन्यापासून वृश्चिक राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन होईल आणि हे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.
पुढील महिन्यात या लोकांच्या अडचणी दूर होणार आहेत. ताणतणाव दूर होणार आहे. मुलांकडून आनंदी वार्ता मिळणार आहे. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुद्धा उत्तम राहील.
कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. या लोकांना सूर्य देवाच्या कृपेने चांगला पैसा मिळणार आहे.
सिंह : सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशी प्रमाणे सिंह राशीच्या लोकांनाही फायदेशीर ठरेल. या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी होणार आहे परिवारात सुख समाधान राहणार आहे. कामानिमित्ताने दूरचे प्रवास करावे लागू शकतात. पण या प्रवासातून काहीतरी चांगलाच लाभ होणार आहे.
परिवारासमवेत पिकनिकचा प्लॅन सुद्धा बनवला जाऊ शकतो. मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. या लोकांचा मानसन्मान वाढणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. या लोकांचा आत्मविश्वास या काळात चांगला वाढलेला राहील आणि आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे.
मेष : सिंह आणि वृश्चिक राशि प्रमाणेच मेष राशीच्या लोकांनाही सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन अधिक लाभ प्रद ठरणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने समाजात मानसन्मान वाढणार आहे पैशांची प्राप्ती होणार आहे. वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन खूपच आनंदी राहील.
सूर्य देवाच्या कृपेने ताणतणाव दूर होईल आणि अडचणी संपून खऱ्या अर्थाने भाग्योदय होणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगला सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. पैशांचा ओघ तुमच्याकडे राहील.