मेष: आर्थिक कामास विलंब लागेल, मात्र कामे पूर्ण होतील. मनोबल चांगले असणार आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर सुसंवाद साधणार आहात. मानसिक प्रसन्नता राहील. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

वृषभ : आरोग्य उत्तम असणार आहे. कामाचा ताण कमी होईल. उत्साही व आनंदी राहाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमची सर्व समावेशक वृत्ती राहील.

मिथुन : गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. तुम्ही आपल्या विचारांवर ठाम राहाल. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. मानसिक प्रसन्नता लाभेल

कर्क: आज तुम्हाला विनाकारण अस्वस्थता राहील. कामे रखडणार आहेत. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी

सिंह: तुमचा उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे आत्मविश्वासपूर्वक पूर्ण कराल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. सर्वांशी सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : दैनंदिन कामास विलंब होणार आहे. मनोबल कमी असल्याने आज तुम्हाला निरुत्साह जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना अनावश्यक खर्च त्रास देणार आहेत. प्रवास आज नकोत.

तुळ : तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. व्यवसायातील आजचे तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. काहींना विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.

वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही आपल्या मताबद्दल आग्रही राहणार आहात. गुंतवणुकीची कामे आज नकोत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.

धनु : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. जिद्दीने एखादा प्रश्न सोडवणार आहात. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आरोग्य सुधारेल.

मकर : आर्थिक कामास विलंब लागला तरी आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंद लाभणार आहे.

कुंभ : काहींना मानसिक अस्वस्थता असली तरी कामे यशस्वी करणार आहात. वैवाहिक सौख्य लाभणार आहे. तुम्ही आपल्या विचारांवर ठाम असणार आहात, मात्र त्यामुळे मतभेद संभवतात

मीन : काहींना नैराश्य जाणवणार आहे. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. आजचा आपला पूर्ण दिवस नको त्या कामात वाया जाण्याची शक्यता आहे. काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहील.