Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनी ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जैसे ज्याचे कर्म वैसे फळ देतो रे ईश्वर, या अभंगाच्या ओळी आपण नेहमी ऐकतो. या अभंगाच्या ओळींप्रमाणेच शनि देवाचा स्वभाव आहे. जो चांगले कर्म करतो, प्रामाणिक कष्ट करतो त्याला शनिदेव नेहमीच मदत करतो.
दरम्यान नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच शनी ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. जेव्हा जेव्हा शनि देवाचे राशी परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. सध्या शनी ग्रह हा कुंभ राशी मध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील तीन महिने म्हणजेच मार्च 2025 पर्यंत शनिदेव याच राशीमध्ये राहणार आहे.
यामुळे पुढील तीन महिने म्हणजेच 90 दिवस राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरतील असा दावा केला जात आहे. दरम्यान आता आपण शनिदेव कुंभ राशीमध्ये असल्याने याचा राशीचक्रातील कोणकोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तुळा : नवीन वर्षातील सुरुवातीचे तीन महिने तुळा राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील. या काळात नवीन इन्कम सोर्स सापडणार आहेत आणि यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल या काळात अनुभवायला मिळतील. कुटुंबात देखील अगदीच आनंदाचे वातावरण राहणार असून कुटुंबातील व्यक्तींसोबत हे लोक लांबचे प्रवास करतील असे म्हटले जात आहे.
या काळात मात्र तुळा राशीच्या जातकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घेतली तर हे लोक नक्कीच या काळात चांगले यश मिळवू शकणार आहेत. पैशांच्या दृष्टिकोनातून मात्र नवीन वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील.
सिंह : तुळा राशि प्रमाणे सिंह राशीच्या लोकांना देखील पुढील वर्षी सुरुवातीला चांगला लाभ मिळणार आहे. या काळात या लोकांनी गुंतवणूक केली तर त्यांना चांगले रिटर्न मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फारच अनुकूल राहणार आहे.
विशेषता जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना या काळात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीतही हा काळ फायद्याचा राहील. आई-वडिलांकडून या लोकांना फुल सपोर्ट राहणार आहे. नोकरी आणि उद्योगांमध्ये देखील या लोकांना चांगले यश मिळणार आहे.
मेष : तुळा अन सिंह राशी समान मेष राशीच्या लोकांनाही नवीन वर्षाचे सुरुवातीचे काही दिवस आश्चर्यकारक लाभ देऊन जाणार आहेत. या लोकांची अनेक दिवसांपासून ची अडकलेली कामे या काळात मार्गी लागतील.
पैशांच्या बाबतीत हा काळ फायद्याचा राहणार असून आर्थिक चनचन कायमची दूर होऊ शकते. समाजात मानसन्मान वाढणार आहे, कुटुंबात देखील मोठ्या आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल पाहायला मिळतील.