Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. जेव्हा ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते तेव्हा याचा परिणाम राशीचक्रातील विविध राशींवर पाहायला मिळतो. यासोबतच अनेक राजीयोगांचा आणि शुभ योगांचा देखील परिणाम राशींवर पाहायला मिळतो.
दरम्यान 2024 च्या अखेरीस गुरू पुष्य योग तयार होणार असून या योगाच्या प्रभावामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि या लोकांना मोठा आर्थिक धनलाभ होईल अशी शक्यता ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतो. त्यावेळी गुरु पुष्य राजयोग तयार होतो. 2024 च्या अखेरीस देखील हा योग तयार होणार आहे. 21 नोव्हेंबरला हा योग तयार होणार असून याचा प्रभाव हा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर पाहायला मिळणार आहे.
कन्या राशी : ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्य योगामुळे कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. या लोकांची अनेक अडकलेली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या लोकांना नोकरी आणि परीक्षेमध्ये चांगले यश मिळणार आहे. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना या काळात यश मिळणार असे म्हटले जात आहे. या लोकांना आपले आई-वडील आणि जवळच्या लोकांचे सहकार्य लाभणार आहे आणि यामुळे हे प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळवतील. त्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
धनु राशी : कन्या राशि प्रमाणेच धनु राशीच्या लोकांना देखील गुरुपुष्य राजयोग फायद्याचा ठरणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी गुरू पुष्य योग आनंद आणि यश घेऊन येणारा असेल. या काळात या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत घरात आणि कामात देखील या लोकांना चांगले बदल पाहायला मिळतील आणि यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
या राशीच्या पगारदार लोकांना या काळात पगारवाढीची भेट मिळणार आहे. एवढेच नाही तर जे लोक शेअर मार्केट सारख्या ठिकाणी गुंतवणूक करत असतील त्यांना देखील गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली जात आहे. जे लोक मेहनत घेतील त्यांना नक्कीच चांगले फळ मिळणार आहे. या लोकांचा समाजात चांगला मानसन्मान वाढणार आहे सामाजिक स्तरावर या लोकांची एक नवीन आणि चांगली मोठी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.
मीन राशी : कन्या आणि धनु राशीच्या लोकांप्रमाणेच मीन राशीच्या लोकांसाठी देखील 21 नोव्हेंबरचा दिवस फारच महत्त्वाचा आणि अधिक खास ठरणार आहे. या दिवशी या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. गेल्या अनेक दिवसांपासून जी कामे प्रलंबित असतील ती कामे देखील या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या लोकांच्या व्यवसायात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील तसेच जे लोक नोकरी करत असतील त्यांच्याही आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल या काळात पाहायला मिळतील. या लोकांच्या कामाचा त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि वरिष्ठांवर विशेष प्रभाव पडणार आहे. या लोकांचे अडकलेले पैसे या काळात त्यांना परत मिळण्याची शक्यता आहे. या लोकांनी जेवढा विचारही केला नसेल तेवढा लाभ या काळात या लोकांना मिळेल असे जाणकार सांगत आहेत.