Jupiter Sun Venus Mercury Transit : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. तसेच ग्रह नक्षत्र परिवर्तन देखील करत असतात. म्हणजेच एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात देखील ग्रहांचा प्रवेश होत असतो. जेव्हा या घटना होतात म्हणजेच जेव्हा नवग्रहातील ग्रहांचे राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते त्यावेळी राशीचक्रातील काही राशींवर सकारात्मक परिणाम होतो तर काही राशींवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.
दरम्यान नवग्रहातील ग्रहांच्या राशी परिवर्तनाची अशीच एक अनोखी घटना आता घडणार आहे. ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसांनी अर्थातच 31 मे ला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. खरे तर बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते.
ज्याप्रमाणे सूर्य हा ग्रह ग्रहांचा राजा आहे त्याचप्रमाणे बुध ग्रह ग्रहांचा राजकुमार आहे. आता हा ग्रह वृषभ राशीत येणार असल्याने याचा अनेक राशींवर चांगला सकारात्मकं परिणाम होणार आहे. विशेष बाब अशी की या वृषभ राशीमध्ये आधीच गुरु, शुक्र आणि सूर्य विराजमान आहेत. आता येथे बुध ग्रहाचे गोचर होणार आहे.
हे गोचर होताच काही अद्भुत योग तयार होणार आहेत. वृषभ राशीमध्ये एकाच वेळी चार ग्रह युती करणार आहेत. ही एक अनोखी घटना आहे. गुरु, सूर्य, बुध आणि शुक्र यांचा संयोग तयार होणार आहे. एकाच राशीत 4 ग्रह असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
विशेष म्हणजे हे चार ग्रह 12 जूनपर्यंत या राशीत मुक्कामाला राहणार आहेत. यामुळे मात्र राशीचक्रातील बारापैकी तीन राशींवर मोठा सकारात्मक परिणाम होणार असून या राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि अमाप धनलाभ होईल अशी शक्यता आहे.
मेष : या राशीचे जे लोक व्यवसाय करत असतील त्यांना मोठा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूपच मजबूत राहणार आहे. मात्र यात चढ-उतार होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना तज्ञ लोकांचा सल्ला घ्या. घाई गडबडीत इन्वेस्ट करण्याचा निर्णय घेऊ नका. नाहीतर अति घाई आणि संकटात नेई अशी परिस्थिती तयार होऊ शकते. या काळात आरोग्याची देखील चांगली काळजी घ्या. बाकी सर्व गोष्टी तुमच्यासाठी या काळात अनुकूल राहणार आहेत.
कर्क : या राशीचे जे लोक नवीन नोकरी शोधत असतील त्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरी मिळणार असे संकेत मिळत आहेत. तुम्हाला जर फायनान्शियल स्ट्रॉंग व्हायचे असेल तर इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी पण त्यासोबतच सेविंग वर देखील विशेष लक्ष द्या. या काळात तुम्ही आरोग्याची देखील चांगली काळजी घेतली पाहिजे.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना या योगाचा फायदा होणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या बॉसचे चांगले सहकार्य मिळणार आहे. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी चांगली संधी चालून येणार आहे. इन्व्हेस्टमेंट करताना योग्य रीसर्च करूनच इन्व्हेस्टमेंट करा. हा काळ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. मेहनतीला यश मिळणार आहे.