Laxmi Narayan Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राशीचक्रातील बारा राशींवर ग्रहांचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. ग्रहांच्या हालचाली राशीचक्रातील राशींवर परिणाम करत असतात. जेव्हा एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येतात तेव्हा विशिष्ट योग तयार होत असतात. हे योग काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वैदिक ज्योतिष शास्त्रात लक्ष्मीनारायण योगाला विशेष महत्त्व आहे.
या योगामुळे बिघडलेले काम देखील पूर्ण होते. हा योग ज्या व्यक्तीच्या कुंडलित तयार होतो त्या व्यक्तीला अमाप पैसा अन यश मिळत असते. अशा व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश संपादित करता येते.
जेव्हा कुंडलीत एकाच घरात शुक्र आणि बुध एकत्र येतात त्यावेळी हा योग तयार होत असतो. दरम्यान ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र हे दोन ग्रह एकत्र येत असून यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे.
बुधाला ग्रहांचा राजकुमार असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे सूर्य हा ग्रहांचा राजा असतो त्याचप्रमाणे बुध हा ग्रहांचा राजकुमार असून हा बुध जेव्हा शुक्र ग्रहासोबत एकत्र येतो त्यावेळी हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो.
यावेळी मेष राशीमध्ये हा योग तयार झाला असून याचा राशीचक्रातील बारा राशींपैकी तीन राशींवर मोठा सकारात्मक परिणाम पाहायाला मिळणार असून या राशीच्या लोकांना या योगामुळे अनन्यसाधारण असे लाभ मिळणार आहेत. दरम्यान आता आपण या योगामुळे कोणत्या तीन राशींना सर्वाधिक फायदा होणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
वृषभ राशी : या योगामुळे वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. या लोकांना नवीन इन्कम सोर्स मिळणार आहेत. नोकरदारांना लाभ होणार असे संकेत मिळत आहेत. म्हणजेच नोकरदार वर्गाचे प्रमोशन देखील होऊ शकते किंवा त्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.
जर या राशीच्या लोकांना काही आर्थिक अडचण भासत असेल तर ती अडचण देखील दूर होणार आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे. कुटुंबासमवेत या राशीचे लोक चांगला वेळ घालवणार आहेत.
भाऊ-बहिणीमध्ये सुरू असलेले वाद देखील मिटतील अशी शक्यता आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. ज्या लोकांना गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी हा काळ फायद्याचा ठरणार आहे. एकंदरीत या योगामुळे या राशीचे लोक ज्याला हात लावतील ते सोनं होणार आहे.
मिथुन : तुमची राशी मिथुन असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण की या योगाचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. या योगामुळे या राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. या राशीच्या लोकांचे इन्कम देखील वाढणार आहे. विशेष म्हणजे या राशीचे लोक मोठ्या प्रमाणात सेविंग देखील करू शकणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील या योगाचा फायदा होणार आहे.
सिंह : तुमच्या काही जुन्या अडचणी असतील तर त्या या योगामुळे सॉल्व होणार आहेत. या योगामुळे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकणार आहात. नवीन बिजनेस करणाऱ्यांसाठी देखील हा योग फायदेशीर ठरणार असून या काळात जर नवीन व्यवसाय चालू केला तर व्यवसाय सुरू करणाऱ्यांना निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
या योगाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास खूपच वाढणार असून याचा तुम्हाला तुमच्या कामात फायदा होणार आहे. आत्मविश्वास वाढणार म्हणून तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करणार आहात.