Malavya and Bhadra Raja Yoga : नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. तसेच ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते. जेव्हा ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. दरम्यान ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे आणि नक्षत्र परिवर्तनामुळे काही राजयोग देखील तयार होतात.
असेच दोन राजयोग येत्या काही दिवसांनी तयार होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये शुक्र ग्रह तुळा राशीत गोचर करणार आहे आणि यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे.
यानंतर बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल आणि यामुळे भद्रा राज योगाची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे हे राजयोग तब्बल 100 वर्षांनी तयार होणार आहेत. यामुळे आता काही राशीच्या लोकांवर मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. काही राशीच्या लोकांचे नशिब आता चमकणार आहे.
कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा?
कन्या : या लोकांचे संवाद कौशल्य सुधारणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता देखील नाकारून चालत नाही. व्यवसायिकांसाठी हा काळ फायद्याचा ठरणार असून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सध्याची परिस्थिती अनुकूल ठरणार आहे.
व्यवसाय सोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना देखील या काळात चांगला लाभ होणार आहे. कन्या राशीच्या लोकांना या काळात समाजात मानसन्मान मिळणार आहे. या लोकांना या काळात एखादा पुरस्कार मिळू शकतो.
तुळा : या काळात विविध क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला या काळात यश तर मिळणारच आहे शिवाय पैसाही मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फायद्याचा राहील.
व्यापारी वर्गाला अच्छे दिन येणार आहेत. नवीन व्यवसायासाठी सध्याची परिस्थिती अनुकूल राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबात मोठे आनंदाचे वातावरण राहणार आहे.
वृषभ : जे लोक प्रेम संबंधात असतील त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. प्रेम विवाह होण्याचे देखील संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांना काहीतरी नवीन जबाबदारी मिळणार आहे.
अचानक पैसे येणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा काळ फायद्याचा राहणार आहे. पैसा, मान सन्मान इत्यादी गोष्टी तुम्ही या काळात प्राप्त करणार आहात.