Malavya Rajyog Benefits : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते. विशेष म्हणजे ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे आणि नक्षत्र परिवर्तनामुळे काही शुभ योग देखील तयार होत असतात. नुकत्यांचं काही दिवसांपूर्वी असाच एक शुभ राज योग तयार झाला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वैदिक ज्योतिषशास्त्रात 5 महापुरुष राजयोगाचे वर्णन करण्यात आले आहे. या पाच राज योगामध्ये मालव्य राजयोगाचे सुद्धा वर्णन आहे. दरम्यान शुक्र ग्रहामुळे नुकताच हा मालव्य राजयोग तयार झाला आहे. खरे तर शुक्र ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण झाले आहे, त्यामुळे मालव्य राजयोग तयार झाला आहे.
या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण काही राशींचे नशीब यामुळे चांगलेचं चमकणार आहे. या राज योगामुळे राशीचक्रातील 12 पैकी तीन राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहणार आहे.
यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप धनलाभ होणार आहे. दरम्यान आता आपण या राजयोगाचा नेमका कोणाला लाभ होणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सिंह राशी : या शुभ योगाचा सिंह राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात खूपच नेत्र दीपक अशी प्रगती होऊ शकते. तसेच, लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अनपेक्षित लाभ मिळतील आणि मान सन्मान वाढणार अशी शक्यता आहे. या योगामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क राशी : या राशींच्या लोकांसाठी मालव्य राजयोग खूपच फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच नवीन इन्कम सोर्स देखील तयार होणार आहेत. जर तुम्ही व्यवसायात नवीन कल्पनांवर काम करत असाल तर तुम्हाला भविष्यात प्रचंड फायदा होईल. याशिवाय गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट सारख्या ठिकाणाहून देखील तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे.
वृषभ : या मालव्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. ज्या लोकांचे लग्न झालेले नसेल त्यांना विवाहाचे नवीन प्रस्ताव येणार आहेत. या काळात तुमचा खर्च वाढणार आहे मात्र उत्पन्न देखील चांगले राहील अशी शक्यता आहे. वैवाहिक जीवन देखील खूपच चांगले होणार आहे. जे नोकरी करत असतील त्यांना प्रमोशन मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात मधुरता येणार आहे.