Mulank 5 Behaviour : भारतात वैदिक ज्योतिषशास्त्राला मानणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अंकशास्त्र हे वैदिक ज्योतिष शास्त्राचीच एक शाखा आहे. अंक ज्योतिष असे सांगते की व्यक्तीच्या जन्मतारखेवरून देखील त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येणे शक्य आहे. व्यक्तीची जन्मतारीख ही त्याच्या आयुष्याविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगत असते. पैसा, लग्न, बुद्धी अशा विविध गोष्टी जन्मतारखेवरून क्लिअर होतात.
अंक ज्योतिष्य असे सांगते की, मुलांक हा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी उघड करत असतो. मुलांक क्रमांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेवरून निघत असतो. जन्मतारखेत येणाऱ्या अंकांची बेरीज करून हा मुलांक काढला जात असतो.म्हणजेच जर एखाद्याचा जन्म पाच तारखेला झालेला असेल तर अशा व्यक्तीचा मुलांक हा पाच राहणार आहे.
तसेच, जर एखाद्याचा जन्म 14 तारखेला झालेला असेल तर 1+4=5 अशा तऱ्हेने या व्यक्तीचा मुलांक देखील पाच राहणार आहे. दरम्यान आता आपण पाच मुलांक असणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा असतो? या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अंक ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा 5 असतो. हा मुलांक क्रमांक ज्यांचा असतो ते लोक बुद्धिमान असतात. कारण की मुलांक 5 चा ग्रह हा बुध आहे. म्हणजे या ग्रहाचा या लोकांवर परिणाम पाहायला मिळतो. बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा कारक आहे.
त्यामुळे मुलांक पाच असणारे लोक जन्मजात बुद्धिवान असतात. हे लोक खूपच उत्साही आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. या लोकांमध्ये मेहनत घेण्याची ताकत असते. हे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची धम्मक ठेवतात. करिअरमध्ये हे लोक चांगली प्रगती करतात.
मुलांक पाच असणारे लोक आपल्या करिअरमध्ये नेहमीच यशस्वी होत असतात. मुलांक पाच असणाऱ्या मुली खूपच भाग्यवान असतात. पती आणि सासरच्या लोकांसाठी मुलांक पाच असणाऱ्या मुली भाग्यवान असल्याचे म्हटले जाते. या तारखेला जन्मलेल्या मुली या बोलक्या असतात.
पण, या मुलींमध्ये थोडासा बालिशपणा पाहायला मिळतो. यांचा स्वभाव हा हसरा, खेळता असतो. या लोकांना पटकन राग येऊ शकतो. यांच्याकडे पैसे कमवण्याची एक वेगळीच कला असते. या मुलांकाचे लोक कोणाकडूनही काम करून घेण्यात माहीर असतात.