Mulank 5 Girls : भारतात ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राला देखील मोठे महत्त्व आहे. याशिवाय सामुद्रिक शास्त्राला देखील आपल्या देशात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक लोक ज्योतिष, अंकशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रावर विश्वास ठेवतात. खरे तर अंकशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्र हे ज्योतिष शास्त्राचेच भाग आहेत.
अंकशास्त्र असे सांगते की, कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून सुद्धा कळू शकते. विशेष म्हणजे संपूर्ण डेट ऑफ बर्थच नाही तर व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झाला आहे त्या तारखेवरूनच त्या व्यक्तीचे सर्व त्याचे सर्व व्यक्तिमत्व ओळखले जाऊ शकते.
एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याच्या/तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि त्याचा/तिचा जीवनसाथी कसा असेल या संदर्भात देखील माहिती मिळू शकते. अंकशास्त्र असे सांगते की 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुली त्यांच्या पती आणि सासरच्यांसाठी भाग्यवान असतात.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 हा असतो. दरम्यान मुलांक 5 असणाऱ्या मुली तिच्या पतीसाठी आणि सासरच्यांसाठी खूपच लकी असल्याचे म्हटले जाते. या नंबरवर बुध ग्रहाचे राज्य असते.
5 मुळांक असणाऱ्या मुली असतात लकी
अंकशास्त्रातील तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या मुलींचा मुळांक पाच असतो अर्थातच ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झालेला असतो अशा मुली पती आणि सासरच्यांसाठी भाग्यवान मानल्या जातात. तसेच या मुली सासरच्या घरात राज्य करतात, या मुली खुल्या मनाच्या असतात.
आई-वडिलांच्या घराव्यतिरिक्त त्यांना सासरच्या व्यक्तीकडून आणि पतीकडून खूप अधिक प्रेम मिळत असते. या मुली त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन चालतात. शिवाय, ती तिच्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून चालते. या मुलीही दूरदर्शी असतात. तसेच या मुली आनंदी असतात, खूप बोलक्या असतात.
तसेच, या मुली त्यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीवर पटकन प्रभाव टाकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या मुली शांत राहतात. याशिवाय, या मुली व्यवसायिक असतात आणि पतीला त्याच्या कामात आणि व्यवसायात सहकार्य करतात. त्याच वेळी, ते व्यावहारिक देखील असतात आणि प्रत्येक काम खूप प्रामाणिकपणे आणि चांगल्या तऱ्हेने पूर्ण करतात.