Mulank 9 : भारतात वैदिक ज्योतिष शास्त्राला मानणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला जातो. अंक ज्योतिष हा देखील वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्व अशा विविध गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
म्हणजे व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, त्याचे व्यक्तिमत्व कसे राहील, तो कोणत्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो, त्याचे आयुष्य कसे राहणार, आर्थिक परिस्थिती कशी राहणार, लग्न कधी होणार अशा विविध गोष्टीचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
अंक ज्योतीष सांगते की व्यक्तीच्या मुलांकावरून या सर्व बाबी जाणून घेता येऊ शकतात. आता तुम्हाला मूळांक म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्या जन्मतारखेवरून मूळांक काढता येतो.
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9 तारखेला झालेला असेल त्याचा मूलांक क्रमांक हा 9 असतो. तसेच ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 18 तारखेला झालेला असेल त्याचा मूलांक क्रमांक देखील 1+8 = 9 राहणार आहे.
म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा 9 असतो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचा मूळांक 9 असतो ते लोक खूपच नशीबवान असतात. या लोकांना नशिबाची पुरेपूर साथ मिळते. हे लोक कोणतेही काम हातात घेतात तर ते काम आपल्या कष्टाच्या आणि नशिबाच्या जोरावर यशस्वी करून दाखवतात.
अशा लोकांकडे पैशांची कमतरता नसते. जन्मजात नशीबवान असणाऱ्या या लोकांचे आयुष्य लग्नानंतर मोठ्या प्रमाणात बदलते. लग्नानंतर यांना लॉटरीच लागते अस आपण म्हणू शकतो. मुलांक 9 असणाऱ्या लोकांना लग्नानंतर त्यांच्या सासुरवाडीकडून जमीन-जुमला आणि मालमत्ता मिळते.
या लोकांना सासुरवाडीकडून वेळोवेळी पैसेही मिळत असतात. म्हणजेच या लोकांना सासरच्या मंडळी कडून चांगले सहकार्य मिळते. हे लोक व्यवसायात मोठ्या प्रमाणात जोखीम घेतात. नऊ मुलांक असणारे लोक मोठ्या प्रमाणात खर्चिक असतात.
कंजूशी करणे त्यांना आवडत नाही. या तारखेला जन्मलेले लोकांकडे पैशांची कमतरता नसते, ते रिस्क घेण्यास नेहमीच तयार असतात. त्यामुळे त्यांना काही वेळा चांगला फायदा होतो तर काही वेळा लॉस देखील सहन करावा लागतो.