Shani Transit Benefits
Shani Transit Benefits

Shani Transit Benefits : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात असे म्हटले जाते. मात्र जेव्हा नवग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होत असते तेव्हा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाहायला मिळत असतो. न्याय आणि कर्माचे देवता शनिदेव देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात.

शनि देवाचे राशी परिवर्तन हे जवळपास अडीच वर्षांनी होते. म्हणजे एका राशीत शनि देव अडीच वर्ष विराजमान राहतात. म्हणजेच बारा राशींचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनिदेवाला जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो. यानुसार सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत.

राशी परिवर्तनासोबतच शनि देवाचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते. दरम्यान, ज्योतिष शास्त्रातील जाणकार लोकांनी शनि देवाचे लवकरच नक्षत्र परिवर्तन होणार असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिदेव सध्या भाद्रपद नक्षत्रामध्ये उपस्थित असून ऑक्टोबर महिन्याच्या तीन तारखेला शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.

या नक्षत्र परिवर्तनामुळे मात्र राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांना खूपच चांगले लाभ मिळणार आहेत. या काळात नोकरी असो की व्यवसाय या राशीच्या लोकांना सगळीकडे यशचं मिळणार आहे. दरम्यान, आता आपण त्या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

वृषभ : या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. या काळात या लोकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. विदेशवारीचे देखील स्वप्न पूर्ण होणार आहे.

जे लोक नोकरी करत असतील त्यांना प्रमोशन मिळणार अशी शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील अचानक धनाची प्राप्ती होणार आहे. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी देखील हा काळ खूपच फायद्याचा राहणार आहे.

धनु : ऑक्टोबर महिन्यात या राशीच्या लोकांचे भाग्य कलाटणी घेणार आहे. या काळात जे बेरोजगार असतील त्यांना नोकरीची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. जर कोर्टात एखादे प्रकरण सुरू असेल तर अशा प्रकरणांमध्ये तुमचा विजय होण्याची शक्यता बळावते. शैक्षणिक दृष्ट्या हा काळ फायदेशीर राहणार आहे.

म्हणजेच या काळात विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येणार आहे. नोकरी व्यवसाय देखील चांगली प्रगती होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा एक गोल्डन टाईम राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांवर त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकांचा वर्षाव होईल. म्हणजेच नोकरीमध्ये देखील चांगली प्रगती होणार आहे.

मेष : मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना विशेष फायद्याचा राहणार आहे. नवीन इन्कम सोर्स सापडणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. आर्थिक परिस्थिती या काळात चांगली राहील असा अंदाज आहे. आरोग्य उत्तम राहील, कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

या काळात तुमचे अडकलेले पैसे आणि अडकलेले काम पूर्ण होणार आहे. प्रत्यक्ष न्यायदेवता शनिदेव तुमच्या कार्याची जबाबदारी घेतील. अर्थातच शनि देवाच्या कृपेने या राशीच्या लोकांचे आयुष्य नंदनवन होणार आहे. मात्र, असे असले तरी मेहनतीला दुसरा कोणताच पर्याय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे आहे.