Silver Jwellery Benefit : भारतात सोन्याच्या आभूषणांप्रमाणेच चांदीच्या आभूषणांना देखील मोठी मागणी आहे. हिंदू सनातन धर्मात सोन्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच चांदीला देखील महत्त्व आहे. असे म्हणतात की, चांदी देवी लक्ष्मीला खूपच प्रिय आहे. यामुळे चांदीच्या दागिन्यांचा वापर केल्यास याचे अनेक फायदे होतात. वैदिक ज्योतिष शास्त्रात चांदीचे आभूषण घातल्यानंतर जीवनात कोणते सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात, कोणते ग्रह प्रबळ होतात यासंदर्भात सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे.
खरे तर पूर्वी चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात वापरले जात. महिलावर्ग प्रामुख्याने चांदीचे दागिने अधिक घालत असत. आता मात्र काळाच्या ओघात चांदीच्या दागिन्यांचा वापर काहीसा कमी झाल्याचे आढळते. आता आर्टिफिशियल ज्वेलरी मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली आहे.
त्यामुळे चांदीच्या दागिन्याचा वापर काहीसा घटला आहे. मात्र, चांदी परिधान केल्याने आपल्या आरोग्याला असंख्य फायदे मिळतात, असा दावा विज्ञानात केला गेला आहे. ज्योतिष शास्त्रात देखील असेच म्हटले गेले आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, प्रत्येक धातूवर कुठल्यातरी विशिष्ट ग्रहाचे प्रभुत्व असते; त्यानुसार चांदीवर चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांचे प्रभुत्व असते. त्यामुळे चांदीच्या नियमित वापराने कुंडलीतील चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतो.
काय म्हणते ज्योतिष शास्त्र ?
आपल्या देशात ज्योतिषशास्त्राला मानणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले गेले आहे की, प्रत्येक धातूवर अर्थातच सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूवर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामध्ये असे म्हटले गेले आहे की चांदीमुळे चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतात.
कारण की चांदीवर चंद्र आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे जर चांदीचा वापर केला तर चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतात. ज्यावेळी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो, तेव्हा त्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यातील मानसिक तणाव, अशांती, नकारात्मकता, वाईट विचार दूर होण्यास मदत होते.
म्हणजेच चांदीचा वापर केला तर मानसिक तणाव अशांती नकारात्मकता वाईट विचार इत्यादी दूर होण्यास मदत होते. तसेच जेव्हा कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, पैसा येण्यास सुरुवात होते. यामुळे चांदी घातल्याने आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतात, असे ज्योतिष शास्त्रात नमूद करण्यात आले आहे.