Surya Grah Nakshtra Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्यावेळी ग्रहाचे राशी परिवर्तन होते किंवा नक्षत्र परिवर्तन होते त्यावेळी राशीचक्रातील काही राशींवर याचा सकारात्मक तर काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होत असतो.
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनावेळी तसेच राशी परिवर्तनावेळी देखील राशीचक्रातील काही राशींवर सकारात्मक आणि काही राशींवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत असतो. दरम्यान येत्या आठ जूनला सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होत असल्याची माहिती ज्योतिषशास्त्रातील तज्ञांनी दिली आहे.
यामुळे राशीचक्रातील काही राशींवर या गोष्टीचा खूपच शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे. सूर्य ग्रह रोहिणी नक्षत्र सोडेल आणि मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार असून यामुळे या संबंधित राशीच्या लोकांना सुख-समृद्धी आणि अमाप धनलाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत आता आपण सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार? या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
वृश्चिक : सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार असून आठ जून पासून या राशीच्या लोकांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या काळात कुटुंबात खूपच समाधान पाहायला मिळणार आहे.
कुटुंबातील व्यक्ती आनंदी राहतील तसेच आरोग्य देखील खूपच उत्तम राहणार आहे. नवीन वाहन तसेच मालमत्ता खरेदी करण्याचे योग बनत आहेत. या राशीचे काही लोक तीर्थक्षेत्रांवर देखील जाऊ शकतात.
तूळ : सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तुळा राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमचा ताणतणाव आणि अडचणी दूर होणार आहेत. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे परिणामी जर एखाद्यावर कर्ज असेल तर ते कर्ज देखील फिटणार आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग तयार होत आहेत.
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी देखील सूर्यग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूपच फायदेशीर ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. हे लोक या काळात पिकनिकला बाहेर जातील. कुटुंबात सर्व काही सुरळीत राहील. तुमच्या परिवारातील व्यक्ती आनंदी राहतील. लांबच्या प्रवासाचे योग बनत आहेत.