Surya Nakshatra Parivartan : आगामी पंधरा दिवस राशीचक्रातील बारा राशींपैकी काही राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी ठरणार आहेत. या काळात संबंधित राशीच्या लोकांवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. खरे तर ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका निश्चित काळानंतर नवग्रहातील ग्रह आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतात.
एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा ग्रहाचे गोचर होते तेव्हा मानवी जीवनावर याचा थेट परिणाम पाहायला मिळतो. तसेच ग्रह जेव्हा नक्षत्र बदलतात तेव्हा ही मानवी जीवनावर याचा परिणाम होत असतो. दरम्यान काल अर्थातच 25 मे 2024 ला सूर्य ग्रहाने कृतिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे.
सूर्यग्रह आता रोहिणी नक्षत्रात पंधरा दिवसांचा मुक्काम करणार आहे. खरे तर सूर्यग्रहाला ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाते. यामुळे सूर्यग्रह जेव्हा राशी परिवर्तन करत असतो किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो तेव्हा राशी चक्रातील सर्वच्या सर्व राशींवर काही ना काही परिणाम होत असतो.
दरम्यान काल झालेल्या सूर्यग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांना खूपच चांगला लाभ मिळण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या नक्षत्र परिवर्तनाचा कोणकोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मेष : ग्रहांचा राजा सूर्यग्रह रोहिणी नक्षत्रात आला असल्याने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात खूपच चांगले बदल पाहायला मिळणार आहेत. या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. समाजात मानसन्मान वाढणार आहे. डोक्यावर जर कर्जाचा डोंगर असेल तर यातील बहुतांशी कर्ज फिटण्याची देखील शक्यता आहे. धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचे योग तयार होत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे.
धनु : जर तुम्ही धनु राशीचे असाल तर तुमच्यासाठी आगामी पंधरा दिवस खूपच फायद्याचे राहणार आहेत. या काळात तुम्हाला अचानक पैशांची प्राप्ती होणार असे संकेत मिळत आहेत. तुमचा आत्मविश्वास खूपच वाढणार आहे. जर तुमचे काही काम रखडले असेल तर ते काम देखील पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते किंवा पगारवाढीची भेट मिळू शकते. कुटुंबात खूपच प्रसन्न वातावरण राहणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील असा अंदाज आहे.
कर्क : सूर्यग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कर्क राशीच्या लोकांना उद्योग आणि नोकरीमध्ये चांगले यश मिळणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना चांगली बातमी मिळू शकते. मात्र मेहनतीला शॉर्टकट राहणार नाही. जर योग्य मेहनत घेतली तर निश्चितच विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. ज्यांचे अजून लग्न झालेले नसेल अशा अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील अशी देखील शक्यता व्यक्त होत आहे. या काळात सूर्यदेवाच्या कृपेने गुंतवणूक केली तर चांगला फायदा होऊ शकतो.