मेष : मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. मन शांत व संयमी ठेवावे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळावे. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही आपली मते सकारात्मकपणे पटवून द्याल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

मिथुन : अनावश्यक गोष्टीत आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. मानसिक अस्वस्थता असली तरी शांत राहावे. काहींचा आध्यात्मिक व धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. प्रवासात विशेष काळजी घ्यावी.

कर्क : अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काही जण बौद्धिक कार्य करणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

सिंह : मन आनंदी व आशावादी
असल्याने अनेक कामे होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कन्या : जिद्द वाढणार आहे. चिकटीने प्रयत्न करत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. आज तुमचे मनोबल विशेष असणार आहे.

तुळ : आर्थिक कमाई होईल. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक सुसंवाद राहील. एकूणच आजचा दिवस आनंदी असणार आहे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक : कामाचा उरक राहील. अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचा प्रभाव राहील. सर्वत्र आनंदीपणाने वावर राहील. चिंता कमी होतील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज संपेल.

धनु : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.

मकर : नवीन परिचय होतील व त्याचा फायदा होईल. काहींना शेअर्सच्या माध्यमात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत.

कुंभ : हळूहळू तुमची वाटचाल सकारात्मकतेकडे होणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. चिंता, दुःख विसरून कामाला लागाल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मीन : कामे मार्गी लागतील. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येतील. नातेवाईक भेटतील. आनंदी राहावे. मनोबल उत्तम राहणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल.