मेष : तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील.
वृषभ : आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल.
मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल.
कर्क : आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील.
सिंह : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग सफल होतील. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.
तुळ : दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत.
धनु : ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल.
मकर : आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे.
मीन : चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल.