Horoscope
Horoscope

मेष: काहींना विविध लाभ होणार आहेत. मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

वृषभ : तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील.

मिथुन : प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे.

सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल.

कन्या : काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. विविध लाभ होतील.

वृश्चिक : नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे.

धनु : प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामास दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात.

मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.