मेष : जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आपली सर्व महत्त्वाची कामे आज आपण मनोबलाच्या जोरावर मार्गी लावणार आहात. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात आपल्याला नवी दिशा सापडेल.
वृषभ : काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवासाकरिता आज आपल्याला अनुकूलता प्राप्त होईल. आत्मविश्वास उत्तम असल्याने अनेक कामे मार्गी लावणार आहात.
मिथुन : गेले दोन दिवस आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
कर्क : मानसिक स्वास्थ्य कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. दैनंदिन कामांसाठी विलंब लागणार आहे. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
सिंह : आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी आज आवर्जून वेळ काढणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. विविध लाभ होतील.
कन्या : सार्वजनिक कामात तुमचा उत्साहाने सहभाग राहील. काहींना मान-सन्मान लाभेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तुळ : तुमच्यामध्ये नवीन उमेद निर्माण होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना व्यवसायानिमित्त अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नातेवाईक भेटणार आहेत.
वृश्चिक : मानसिक दुर्बलता जाणवणार आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. खर्च वाढणार आहेत. एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो.
धनु : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज आपण अनेकांना सहकार्य करण्यासाठी तत्पर असणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.
मकर : अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. इस्पितळाला भेट द्यावी लागेल. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. कामाचा ताण जाणवणार आहे.
कुंभ : काहींना अचानक धनलाभ होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मानसिक अस्वस्थता कमी होईल. आपण आपल्या मुला-मुलींकरिता वेळ देणार आहात. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. सार्वजनिक कामात तुमचा उत्तम सहभाग राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडणार आहे.