मेष : मानसिक अस्वस्थता असणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. तुमची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक मनस्ताप संभवतात. प्रतिकुलता जाणवणार आहे.
वृषभ : मनोबल वाढणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी राहाल.
मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमची महत्त्वाची कामे तुम्ही मार्गी लावू शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. सर्वत्र तुमचा प्रभाव व दबदबा राहील. काहींना मान-सन्मान लाभेल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. मनोबल उत्तम राहील. आरोग्याचा त्रास कमी होईल. नवी दिशा सापडेल. कामाचा ताण कमी झाल्याने आनंदी होणार आहात. प्रवास सुखकर होतील.
सिंह : कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचे मनोबल उत्तम राहील.
तुळ : निरुत्साही वातावरणात काम करावे लागेल. एखाद्या अप्रिय घटनेला सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आर्थिक लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. आर्थिक कामाकरिता आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.आरोग्य उत्तम राहील.
धनु : मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. नव्या उमेदीने कामाला लागणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहील.
मकर : उत्साह व उमेद वाढणार आहे. एखादी आनंददायी घटना घडेल. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
कुंभ : मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. आपले मनोबल कायम ठेवावे. शांत व संयमी रहावे. वादविवादात सहभाग टाळावा. प्रवासात ववाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
मीन : उत्साह वाढेल. अनुकूलता लाभेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.