मेष : तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी आज आपल्याला लाभणार आहे. आपले मनोबल अपूर्व असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नवी दिशा सापडेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.
वृषभ : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा प्रभाव राहणार आहे. आर्थिक कामांकरिता आज आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मिथुन : तुम्ही आपली मते व विचार आज स्पष्टपणे व सकारात्मकपणे मांडणार आहात. तुमचा प्रभाव वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
कर्क : मानसिक दुर्बलता राहील. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
सिंह: मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.
कन्या : मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामे व दैनंदिन व्यवहार विनासायास पूर्ण करू शकणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात.
तुळ : आज तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमचे मनोबल व तुमचा आत्मविश्वास आज वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक नैराश्य जाणवेल. वादविवाद टाळावेत. शांत व संयमी राहावे. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
धनुः आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम असणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
मकर: काहींचा आज आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासात एखादी मनस्तापदायक घटना संभवते. वाहने सावकाश चालवावीत. आपली आज चिडचिड होणार आहे. स्वास्थ्य कमी राहील.
कुंभ : विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काहींना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींत रमणार आहात. आपल्या सहकाऱ्यांचे आपल्याला आज उत्तम सहकार्य लाभणार आहे.
मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे.