Horoscope
Horoscope

मेष : अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे.

वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे.

मिथुन : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील.

कर्क : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

सिंह : व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या : आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे.

तुळ : कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील.

वृश्चिक : विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे.

धनु : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

मकर : जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

कुंभ : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे.