Horoscope
Horoscope

मेष: उत्साह व उमेद वाढेल. नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणुकीची कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल.

वृषभ : दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.

कर्क : महत्त्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी राहाणार आहात.

सिंह : कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. उत्साह व उमेद वाढेल.

कन्या : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

तुळ : मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे.

वृश्चिक : नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल.

धनु : दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

मकर : हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे.

कुंभ : दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.

मीन : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावीत. मनोबल कमी राहील.