महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांचे वातावरण होते आणि त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली होती.महाराष्ट्रात मागील १४ महिन्यांपासून जिल्हा परिषदेत नोकरीसाठी पद भरती चालू होती.त्या भरती मधील काही पदाच्या नियुक्त्यांना ब्रेक लागला होता.
आचारसंहिता लागु होईपर्यंत प्रशासनाने जमेल तेवढ्या नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला; मात्र अजूनही ४०० जणांच्या नियुक्त्या देणे बाकी आहे.आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे राहिलेल्यांची कागदपत्र पडताळणी व इतर कामे होऊन महिनाभरात या उमेदवारांना नियुक्ती मिळेल अशी शक्यता आहे.
पण आता आचारसंहिता संपल्यामुळे शिल्लक राहिलेल्या पदांच्या नियुक्त्या करण्यासाठी लवकरच पद भरणीचे काम चालू होणार आहे.या भरतीत आरोग्य सेवकांसह इतर काही पदांचा समावेश असणार आहे.
आतापर्यंत एकूण ९३७ पदांसाठी परीक्षा झाल्या आणि निकाल सुद्धा जाहीर झाले आणि आतापर्यंत त्यातील ४६६ जणांना जिल्हा परिषदेत नियुक्त करण्यात आले आहे.
पण ६० ते ७० जागांसाठी योग्य पात्रतेचे उमेदवारच मिळालेले नाहीत.त्यामुळे अजूनही ४०० उमेदवारांना नियुक्तीची वाट बघावी लागत आहेत.
नगर जिल्हा परिषदे मार्फत १९ संवर्गातील ९३७ पदांसाठी ५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.आयबीपीएस या कंपनीने भरतीची ही प्रक्रिया सुरू केली.
यातील काही संवर्गाची परीक्षा ऑक्टोबर २०२३ मध्ये, तर काही संवर्गाची परीक्षा जुलै २०२४ पर्यंत झाली.त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर झाले.ऑगस्ट २०२४ मध्ये निकाल लागलेल्या सात संवर्गातील ४३ उमेदवारांना निवडपत्र वितरित करण्यात आले.
५० टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात होते त्या आरोग्यसेवक (पुरुष ५० टक्के हंगामी फवारणी), आरोग्यसेवक (पुरुष इतर ४० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा संवर्गातील एकूण ७६३ पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्याने या परीक्षा ३० जुलै २०२४ अखेर पूर्ण झाल्या. त्या पदांचे उशिरा निकाल ३० ऑगस्ट अखेर लागले.
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून निवड याद्या प्रसिद्ध करून नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले. ऑक्टोबर महिन्यात २८५ आरोग्य सेविकांना नियुक्त करण्यात आले आहे.