ATM Card Fraud
ATM Card Fraud

ATM Card Fraud : तुमचेही एटीएम कार्ड आहे ना, तुम्हीही एटीएम मधून पैसे काढता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. खरेतर अलीकडे पैशांचे व्यवहार हे खूपच सोपे झाले आहेत. यूपीआयच्या मदतीने आता केवळ एका क्लिकवर कोणालाही पैसे ट्रान्सफर करता येत आहेत. यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा असंख्य पेमेंट एप्लीकेशन लाँच झाल्या आहेत.

मात्र असे असले तरी आजही अनेकजण एटीएममध्ये जाऊन एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही त्यातलेच एक असाल तर एटीएम मधून पैसे काढताना सावधानता बाळगा अन्यथा तुमचे बँक अकाउंट काही मिनिटातच रिकामे होऊ शकते.

कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र दिल्लीमधील एका महिलेसोबत असाच एक स्कॅम झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजधानी दिल्ली येथील मयूर विहार भागातील एक महिला रहिवासी ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेली. पैसे काढताना मात्र तिचे एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकले.

या एटीएम मशीन जवळ एकही गार्ड नव्हता. यामुळे आपल एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकल्याने ती महिला थोडीशी गोंधळून गेली. यानंतर ATM बाहेर असलेल्या एका व्यक्तीने त्या महिलेला एटीएमच्या भिंतीवर लिहिलेला नंबर एजंटचा असल्याचे सांगत कॉल करायला लावला.

नंतर महिलेने त्या नंबर वर कॉल केला. मग त्या अज्ञात व्यक्तीने त्या महिलेला काही स्टेप्स फॉलो करायला लावल्यात. पण तरीही त्या महिलेचे कार्ड काही निघाले नाही. यानंतर मग त्या व्यक्तीने सदर महिलेला दुसऱ्या दिवशी इंजिनियर्स येऊन एटीएम मधून तिचे कार्ड काढून तिला परत करतील असे आश्वासन दिले.

यानंतर मात्र सदर महिलेच्या अकाउंट मधून २१ हजार रुपयांची रक्कम कपात झाल्याचे उघकिस आले. विशेष म्हणजे त्या महिलेचे एटीएम कार्ड देखील गायब झालेले होते.

अशा तऱ्हेने सदर महिलेची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे जर तुमच्या सोबतही अशी घटना घडली तर भिंतीवर लिहिलेल्या नंबरवर किंवा अज्ञात व्यक्तीने दिलेल्या नंबरवर विश्वास ठेवू नका.

एटीएममध्ये कार्ड अडकल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम बँकेशी संपर्क साधा. तुम्हाला बँकेचा नंबर हवा असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तो नंबर सहजतेने मिळवू शकता.

तसेच तुमचा एटीएमचा पिन कोणासोबतच शेअर करू नका. जर तुमची फसवणूक झाली असेल तर ताबडतोब तुमच्या बँकेत जाऊन याबाबतची माहिती द्या. पोलिसात सुद्धा तुमच्या सोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार नोंदवा.

स्कॅमर्स नेहमीच अशा काही युक्त्या वापरतात ज्या की आपल्याला संशयास्पद वाटत नाहीत. मात्र, आपण कोणावरही लगेचच विश्वास न ठेवता अशा काही घटना घडल्यात तर अधिकृत व्यक्तींशीच संपर्क साधला पाहिजे.