Bank Of Baroda Home Loan
Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : तुम्हीही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरेतर देशातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका परवडणाऱ्या दरात ग्राहकांना गृह कर्ज ऑफर करत आहेत.

यात बँक ऑफ बडोदा या पब्लिक सेक्टर मधील महत्त्वाच्या बँकेचा देखील समावेश होतो. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी कमी व्याजदरात होम लोन ऑफर करते. बँकेकडून ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना कमी रेट मध्ये होमलोन ऑफर केले जात आहे.

आज आपण बँक ऑफ बडोदा या बँकेकडून 40 लाख रुपयांचे होम लोन मंजूर झाले तर किती व्याज कर्जदार व्यक्तीला भरावे लागणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हीही बँक ऑफ बडोदाकडून लोन घेण्याचा तयारीत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.

बँक ऑफ बडोदाचे व्याजदर

मीडिया रिपोर्टनुसार, बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 8.40% या किमान व्याजदरात होम लोन ऑफर करत आहे. पण हे व्याजदर सर्वच ग्राहकांना लागू राहणार नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या किमान व्याज दरात हे कर्ज मिळते.

किती सिबिल स्कोर असल्यास कमी व्याजदरात कर्ज मिळते

ज्यांचा सिबिल स्कोर हा किमान 800 च्या जवळपास असेल अशा ग्राहकांना या किमान व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकत. परंतु ज्यांचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी असेल त्यांना निश्चितच अधिकचे व्याजदर आकारले जाऊ शकते.

40 लाखाचे कर्ज 20 वर्षाच्या कालावधीसाठी घेतल्यास किती व्याज

जर समजा एखाद्या ग्राहकाला बँक ऑफ बडोदाच्या किमान 8.40% या व्याजदरात चाळीस लाख रुपयांचे कर्ज 20 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 34,460 रुपये एवढा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत 42.70 लाख रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे.

म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 82.70 लाख रुपये सदर ग्राहकाला भरावे लागणार आहेत. तथापि या संपूर्ण कॅल्क्युलेशनमध्ये प्रोसेसिंग शुल्कचा समावेश झालेला नाही. म्हणजेच प्रोसेसिंग शुल्क तथा इतर काही चार्जेस असतील तर ते पैसे आणखी यात जोडावे लागणार आहेत.