अहिल्यानगर, दि.१० – राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशा पालकांसाठी मधुक्रांती madhukranti.in/nbb या पोर्टलवर नोंदणींचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या मधुमाशिका पालकांना ओळखपत्र (Recognition) दिले जाईल. प्रत्येक नोंदणीकृत पालकाला १ लाख रूपयांचा विमा लाभ मिळेल व मधमाशांच्या स्थानांतरासाठी सहजसोपी प्रक्रिया राबवली जाईल.

नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेले बँक खाते तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार – २०० kb पर्यंत) व मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार -१०० kb पर्यंत) आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. मधमाशांच्या संख्येनुसार रूपये २५० ते रूपये २० हजारांपर्यंत नोंदणी शुल्क असणार आहे.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली ०११-२३३२५२६५, २३७१९०२५, मधुक्रांती पोर्टल – Tech Support – १८००१०२५०२६ आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे (०२०) २९७०३२२८ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.